मराठी व्याकरण

सौजन्य: स्पर्धा परीक्षा तयारी

👉 मराठी व्याकरण
👉 मराठी व्याकरण सराव प्रश्न
👉 म्हणी
👉 अर्थ आणि वाक्यप्रचार
👉 बोधकथा
👉 दररोज दिनविशेष

https://t.me/esprdhapariksha

For more visit http://Rameshwarmaske.blogspot.in

View in Telegram

Recent Posts

उद्यापासून दररोज काही मोजक्या मराठी व्याकरण विषयक नोटस उपलब्ध करण्यात येतील.
२) अन हा उपसर्ग लावून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द:

अनुभवी×अननुभवी
आरोग्य×अनारोग्य
अपेक्षित×अनपेक्षित
अवधान×अनवधान
आवश्यक×अनावश्यक
आदर×अनादर
आवृत्त×अनावृत्त
आसक्त×अनासक्त
आस्था×अनास्था
इच्छा×अनिच्छा
उत्तीर्ण×अनुत्तीर्ण
उदार×अनुदार
औरस×अनौरस
१) अ उपसर्ग लावून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द :

कुशल×अकुशल
चल×अचल
तुलनिय×अतुलनिय
दृश्य×अदृश्य
नियमित×अनियमित
नित्य×अनित्य
नियंत्रित×अनियंत्रित
निश्चित×अनिश्चित
नीती×अनीती
न्याय×अन्याय
पराजित×अपराजित
परिचित×अपरिचित
पवित्र×अपवित्र
पारदर्शक×अपारदर्शक
पूर्ण×अपूर्ण
पूर्णांक×अपूर्णांक
प्रकट×अप्रकट
प्रत्यक्ष×अप्रत्यक्ष
प्रमाण×अप्रमान
प्रसन्न×अप्रसन्न
प्रशस्त×अप्रशस्त
प्रसिद्ध×अप्रसिद्ध
प्रामाणिक×अप्रामाणिक
प्रिय×अप्रिय
मर्यादित×अमर्यादित
मूर्त×अमूर्त
यशस्वी×अयशस्वी
योग्य×अयोग्य
लिखित×अलिखित
लौकिक×अलौकिक
रसिक×अरसिक
रुंद×अरुंद
विकारी×अविकारी
विचारी×अविचारी
विभक्त×अवजभक्त
विवाहित×अविवाहित
विवेकी×अविवेकी
विस्मरणीय×अविस्मरणीय
विश्वास×अविश्वास
वैध×अवैध
व्यवस्थित×अव्यवस्थित
शक्य×अशक्य
शाश्वत×अशाश्वत
शांत×अशांत
शुद्ध×अशुद्ध
शुभ×अशुभ
सभ्य×असभ्य
समंजस×असमंजस
समान×असमान
समाधान×असमाधान
सफल×असफल
समर्थ×असमर्थ
सहकार×असहकार
सत्य×असत्य
साध्य×असाध्य
सामन्य×असामान्य
साधारण×असाधारण
स्पृश्य×अस्पृश्य
सूर×असुर
सुरक्षित×असूरक्षित
संतुष्ट×असंतुष्ट
संतोष×असंतोष
स्थिर×अस्थीर
स्पष्ट×अस्पष्ट
स्वच्छ×अस्वच्छ
स्वस्थ×अस्वस्थ
हिंसा×अहिंसा
ज्ञान×अज्ञान
ज्ञात×अज्ञात
क्षय×अक्षय
क्षम्य×अक्षम्य
ज्ञानी×अज्ञानी
पोलीस शिपाई भरती 2021 लेखी परीक्षामध्ये सर्वात जास्त प्रश्न ❤️🔥😊
1) ‘सजातीय’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा.

   1) उपजातीय      2) विजातीय   
   3) संकीर्णजातीय    4) अजातीय

उत्तर :- 2

2) ‘उचलली जीभ लावली टाळयाला’ या म्हणीचा अर्थ काय ?

   1) घशाला      2) एक सारखे बोलत राहणे
   3) मनात येईल तसे बोलणे  4) काहीच न बोलता गप्प राहणे

उत्तर :- 3

3) ‘धीर सोडणे’ हा अर्थ सूचित करणारा वाक्प्रचार ओळखा.

   1) हात टेकणे    2) हाडाची काडे करणे
   3) हातपाय गाळणे  4) हातखंडा असणे

उत्तर :- 3

4) “बोधपर वचन” या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.

   1) सुभाषित    2) सुविचार   
   3) ब्रीदवाक्य    4) वरील सर्व

उत्तर :- 4

5) खालीलपैकी शुध्द शब्द कोणता  ?

   1) नीयुक्त    2) नीयूक्त   
   3) नियुक्त    4) नियुत्क

उत्तर :- 3

6) खालीलपैकी दंततालव्य वर्ण कोणता?
   1) र      2) ग     
   3) ज      4) यापैकी नाही
उत्तर :- 3

7) उच्छेद या जोडशब्दातील अचूक पोटशब्द ओळखा.

   1) उ + च्छेद    2) उत + च्छेद   
   3) उच् + छेद    4) उत् + छेद

उत्तर :- 4

8) शब्दाची जात बदलून वाक्यरचना करा.
     ‘त्याच्या डोळयात पाणी आले.’

   1) त्याच्या डोळयात पाणी येते    2) त्याच्या डोळयातून पाणी वाहते
   3) त्याचे डोळे पाणावले      4) त्याच्या डोळयांना धरा लागतात

उत्तर :- 3

9) ‘अर्धी रक्कम, पाव हिस्सा, पाऊण माप’ ही संख्यावाचक विशेषणे विशेषणाच्या कोणत्या प्रकारात मोडतात ?

   1) पूर्णासूचक संख्या विशेषण    2) अपूर्णांकसूचक संख्याविशेषण
   3) अनिश्चित संख्यासूचक विशेषण    4) साकल्यवाचक संख्याविशेषण

उत्तर :- 2

10) जा, ये, उठ, बस, खा, पी वगैरे धातूंपासून जी क्रियापदे तयार होतात त्यांना .................... म्हणतात.

   1) सिध्द क्रियापद    2) साधित क्रियापद
   3) संयुक्त क्रियापद    4) व्दिकर्मक क्रियापद

उत्तर :- 1
🧿.ध्वनिदर्शक शब्द 🧿

🔸. हंसाचा : कलख

🔸. भुंग्यांचा, मधमाश्यांचा : गुंजारव

🔸. माकडांचा : भुभु:कार

🔸. म्हशींचे : रेकणे

🔸. मोराचा : केरकाव

🔸. मोरांची : कैकावली

🔸. सिंहाची : गर्जना

🔸. पंखांचा : फडफडाट

🔸. पानांची : सळसळ

🔸. डासांची : भुणभुण

🔸. रक्ताची : भळभळ
🧿.ध्वनिदर्शक शब्द .🧿

🔸. वाघाची : डरकाळी

🔸. कोल्हयांची : कोल्हेकुई

🔸. गाईचे : हंबरणे

🔸. गाढवाचे : ओरडणे

🔸. घुबडाचा : घूत्कार

🔸. घोडयाचे : किंचाळणे

🔸. चिमणीची : चिवचिव

🔸. कबुतराचे/पारव्याचे : घुमणे

🔸. कावळ्याची : कावकाव

🔸. सापाचे : फुसफुसने

🔸. हत्तीचे : चित्कारणे
🧿. 10 म्हणी व त्यांचे अर्थ .🧿

♦️. काठी मारल्याने पानी दुभंगत नाही
रक्ताचे नाते तोडून म्हणता तुटत नाही.

♦️. कडू कारले तुपात तळले साखरेत घोळले तरीही कडू ते कडूच
किती ही प्रयत्न केला तरीही माणसाचा मूळ स्वभाव (दूर्वर्तणी) बदलत नाही.

♦️. कुडी तशी पुडी
देहाप्रमाणे आहार असतो.

♦️. कधी तुपाशी तर कधी उपाशी
संसारिक स्थिती नेहमी सारखीच राहत नाही त्यात कधी संपन्नता येते तर कधी विपन्नावस्था येते.

♦️. कावळा बसायला अन फांदी तुटायला
परस्परांशी कारण-संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाचवेळी घडणे.

♦️. कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच
कितीही प्रयत्न केले तरी काहीचा मूळस्वभाव बदलत नाही.

♦️. कुंपणाने शेत खाल्ले तर दाद न्यावी कुणीकडे
रखवालादारानेच विश्वासघात करून चोरी करणे.

♦️. कोल्हा काकडीला राजी
क्ष्रुद्र माणसे क्षुद्र गोष्टीनीही खुश होतात.

♦️. कोरड्याबरोबर ओले ही जळते
निरपराध्याची अपराध्यासोबत गणना करणे

♦️. कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही
निश्चित घडणारी घटना कोणाच्याही प्रयत्नाने टाळता येत नाही.
⭕️ Subject - Marathi Grammar ⭕️

🌇 समानार्थी शब्द 🌇


बदल = फेरफार, कलाटणी
बर्फ = हिम
बहीण = भगिनी
बक्षीस = पारितोषिक, पुरस्कार
बाग = बगीचा, उद्यान, वाटिका
बासरी = पावा
बेत = योजना
बाळ = बालक
बाप = पिता, वडील, जनक
बादशाहा = सम्राट
बुद्धी = मती
ब्रीद = बाणा
भरवसा = विश्वास
भरारी = झेप, उड्डाण
भव्य = टोलेजंग
भुंगा = भ्रमर, भृंग, मिलिंद, मधुकर
भाट = स्तुतिपाठक
भारती = भाषा, वैखरी

#Marathi_Grammar

Join : http://t.me/marathigrammer
महत्वपूर्ण मराठी व्याकरण सराव प्रश्नोत्तरे भाग ०२#Marathigrammer

1) ‘चंद्रोदय’ या जोडशब्दात एकत्र येणारे स्वर व संधी बनलेला वर्ण ओळखा.
1) आ + उ = ओ 2) द्र + ओ = द्रो
3) अ + उ = ओ 4) र + ओ = रो
उत्तर :- 3

2) नामाच्या उपप्रकारांपैकी फक्त ......................... अनेकवचन होते.
1) विशेषनामाचेच 2) धर्मवाचक नामाचेच
3) भाववाचक नामाचेच 4) सामान्य नामाचेच
उत्तर :- 4

3) खालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. – हा माझा वर्गबंधू आहे.
1) दर्शक सर्वनाम 2) संबंधी सर्वनाम
3) आत्मवाचक सर्वनाम 4) पुरुषवाचक सर्वनाम
उत्तर :- 1

4) ‘कडक ऊन पडले आहे’ अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा.
1) धातुसाधित 2) संख्यावाचक
3) गुणवाचक 4) सार्वनामिक
उत्तर :- 3

5) ‘मला दोन मैल चालवते.’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता ?
1) प्रयोजक क्रियापद 2) संयुक्त क्रियापद
3) शक्य क्रियापद 4) अनियमित क्रियापद
उत्तर :- 3

Join : http://t.me/marathigrammer
🔰 तलाठी भरती २०१९ महत्वपूर्ण मराठी व्याकरण सराव प्रश्नोत्तरे ०१ 🔰
Join : http://t.me/marathigrammer

1) खालील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. – द्रिष्ट लागणे अथवा दृष्ट लागणे.
1) टक्‍ लावून पाहणे 2) प्रेमात पडणे
3) पाहिल्यामुळे झालेले नुकसान लक्षात येणे 4) डोळे बंद ठेवणे
उत्तर :- 3

2) ‘मितव्ययी’ या शब्दसमूहाचा अर्थ काय ?
1) मोजकाच आहार घेणारा 2) मोजकीच बाजू घेणारा
3) मोजकाच खर्च करणारा 4) मोजकेच बोलणारा
उत्तर :- 3

3) खालील शब्दाचे योग्य लेखन कोणते ?
1) शार्दुल वीक्रीडित 2) शार्दुल विक्रीडीत
3) शार्दुल वीक्रीडीत 4) शार्दुल विक्रीडित
उत्तर :- 4

4) खालीलपैकी कोणते व्यंजन कंपित व्यंजन आहे ?
1) स 2) श 3) न 4) र
उत्तर :- 4

5) ‘देवालय’ या संधीचा विग्रह कसा कराल.
1) देवा + अलय 2) देवा + आलय 3) देव + आलय 4) देव् + आलय
उत्तर :- 3

महत्वपूर्ण मराठी व्याकरण सराव प्रश्नोत्तरे खालील लिंकवर उपलब्ध....
http://t.me/marathigrammer
मराठी टेस्ट पेपर #Test
Join : t.me/marathigrammer
★ मूलभूत मराठी व्याकरण ★
Join : T.me/MpscPune1
★ मराठी व्याकरण ★
Join : t.me/mpscpdfs
मराठी टेस्ट #Test
देशात मराठी भाषा आता तिसऱ्या स्थानी

• देशात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेत मराठी भाषेने आता तेलुगू भाषेला मागे टाकत या यादीत आता तिसऱ्या स्थानी आहे.प्रथमस्थानी हिंदी ही भाषा तर दुसऱ्या स्थानावर बंगाली ही भाषा आहे.

• २०११ मधील जनगणनेच्या आधारे देशातील कोणती भाषा किती बोलली जाते याची यादी तयार करण्यात आली आहे.

• हिंदी मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण २००१मध्ये ४१.०३ टक्के इतके होते. तर २०११ मध्ये हे प्रमाण वाढले असून ते ४३. ६३ टक्क्यांवर पोहोचले आहे.हिंदी भाषा ही प्रथम स्थानी पोहचली आहे तर बंगाली भाषा दुसऱ्या स्थानी आहे. बंगाली मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण ८.१ टक्क्यांवरुन ८.३ टक्क्यांवर पोहोचले आहे.

• मराठी भाषा बोलणाऱ्यांचे प्रमाण २००१ च्या तुलनेत २०११ मध्ये वाढले आहे. २००१ मध्ये मराठी मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण ६.९९ टक्के होते. २०११ मध्ये हे प्रमाण ७.०९ टक्क्यांवर पोहोचले आहे. मराठीने याबाबतीत तेलुगूला मागे टाकले आहे. तेलुगू मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण घटले आहे. तेलुगू भाषा बोलणाऱ्यांचे प्रमाण ७. १९ टक्क्यांवरुन ६.९३ टक्क्यांवर घसरले आहे.

• मातृभाषेच्या यादीत उर्दू ही सातव्या स्थानी असून २००१ मध्ये उर्दू भाषा ही सहाव्या स्थानी होती. तर आता गुजराती भाषा सहाव्या स्थानी पोहचली आहे.

• देशातील २.६ लाख लोकांनी इंग्रजी ही मातृभाषा असल्याचे सांगितले.महाराष्ट्रात इंग्रजी भाषा बोलणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक असून राज्यातील १.०६ लाख लोकांची इंग्रजी मातृभाषा आहे. तर इंग्रजी मातृभाषा असलेल्यांच्या यादीत तामिळनाडू दुसऱ्या स्थानी आहे.

• राज्यघटनेतील २२ सूचीबध्द भाषांमध्ये संस्कृत ही सर्वात कमी बोलली जाणारी भाषा असून देशात फक्त २४,८२१ लोकांनी संस्कृत ही मातृभाषा असल्याचे म्हटले आहे.तसेच भाषा बोलणाऱ्यांच्या संख्येनुसार संस्कृत ही भाषा बोडो, मणिपुरी, कोकणी भाषेच्याही खाली आहे.
दररोज संध्याकाळी ०७-०८ या वेळेत चालू घडामोडी सराव प्रश्नोत्तरे दररोज Facebook Page वर टाकले जातील. त्यासाठी आजच फेसबुक वर @esprdhapariksha Page ला Follow करा व लाईक करा...

👉https://www.facebook.com/esprdhapariksha/
★ मराठी व्याकरण नोट्स ★
★ #Mpsc#PSI/STI/ASO ★
Size : 2.9 MB
Join : t.me/marathigrammer
★ मराठी व्याकरण नोट्स ★
★ #Mpsc#PSI/STI/ASO ★
Join : t.me/marathigrammer
See more posts

View in Telegram