व्हाईट गोल्ड ट्रस्ट, छत्रपती संभाजीनगर (White Gold Trust, Chatrapati Sambhajinagar)

शेतीविषयी माहिती साठी संपर्क 8888167888

View in Telegram

Recent Posts

👉उन्हाळी तिळाची पेरणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान करू शकतो हा योग्य कालावधी आहे उन्हाळी तिळामध्ये विद्यापीठाचे सुधारीत वाणांमध्ये AKT १०१, NT ११ असे वाण असून खाजगी कंपन्यांचे वेस्टर्न दप्तरी आणि इतर कंपन्यांचे काही वाण आहेत. उन्हाळी तिळामध्ये सव्वा ते दीड किलो एकरी बियाणे वापरावे लागते त्यात विरळणी कारण अत्यंत महत्वाचं आहे पेरणी व्यवस्थित व्हावी जास्त खोल दाणा पडू नये याची सुद्धा आपण काळजी घेणं गरजेचं आहे तिळाला सुद्धा रिहांश आणि पिक्सालची बीज प्रक्रिय आपण करू शकतो.आणि पेरणी सोबत १०:२६:२६ किंवा डीएपी अधिक पोटॅश हे खत द्याला हरकत नाही. उन्हाळी तिळामध्ये विरळणी दोन वेळेस करून योग्य अंतर दोन रोपातील १० सेंमी पर्यंत अंतर ठेवावं.

👉 उन्हाळी मूग हा उशिरा पेरणी करण्यास योग्य पीक आहे ५ फेब्रुवारी ते १५ मार्चच्या दरम्यान आपण उन्हाळी मुगाची पेरणी करू शकतो. या मध्ये साधारणतः बरेच वाण जे आहे खाजगी कंपन्यांचे आणि सुधारित विधापीठाचे संशोधित वाण सुद्धा बाजारामध्ये आहे एकरी बियाणे हे ६ ते ७ किलो पेरावे रिहांश आणि जोरमेटची बीजप्रक्रिया करावी आणि पेरणी सोबत खत २०:२०:०:१३ २४:२४:०:८ हे खत देऊ शकतो.

👉 कापसाचे फरदड शक्यतो घेणे टाळावे आणि जर घ्याचेच असेल तर तीन चार फवारे करून अळीचे नियंत्रण करायचे असेल तरच कापसाचं फरदड आपण घेऊ शकतो.

👉 ज्वारी बाजरी आणि मका या पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव असल्यास व्हिटारा प्लस ४० मिली हे उत्तम अळीनाशक आणि त्या नंतर इमान १० ग्रॅम + पांडासुपर ३० मिली असे आलटून पालटून फवारणी द्यावी.

👉 कांद्याला रायझर जी एकरी ५ ते १० किलो दिल्यास अमृता सारखा त्याला फायदा होतो आणि कांद्याचे थ्रिप्स नियंत्रण करण्यासाठी आलटून पालटून स्वस्त कीटकनाशक फवारावे त्यामध्ये रेज, रोगर, कराटे, पांडासुपर, सरेंडर या कीटकनाशकांचा समावेश होतो.

👉 उसाचं पाचट जळू नये पाचट जागीच कुटी करावी किंवा तसेच राहू द्यावे व बिना मशागत खोडवा व्यवस्थापन करावं.
🛑श्री गजानन जाधव साहेबांचा कृषी सल्ला🛑

🌱हरभऱ्या बद्दल माहिती🌱

👉काही ठिकाणी धुवारीमुळं हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात फुलगळ झालेली आहे अशा ठिकणी नवीन फुलं काढण्यासाठी झेप २० मिली व १२:६१:० १५० ग्रॅमचा फवारा देऊ शकतो.
👉हरभऱ्या मध्ये फुजेरियम विल्ट या मर रोगाचं जमिनीतून वाढणाऱ्या रोगामुळे विविध अवस्थेमध्ये हरभरा मरतोय, काही ठिकणी हरभरा वरून खाली मरतोय, काही ठिकाणी खालून वळतोय काही ठिकाणी पिवळा पडला आहे हे सगळे मर रोगाचे लक्षण असून याच्या नियंत्रणासाठी एलियट या बुरशीनाशकाचा जमिनीवर दाट फवारा जास्त पाणी वापरून फवारा द्यावा. कुठल्या हि कीटकनाशक किंवा संजीवकासोबत हे बुरशीनाशक आपण वापरू शकतो.
👉हरभऱ्याला विविध अवस्थे मध्ये विविध फवारण्या दिल्यास चांगलं फायदा होतो पेरणीच्या वेळा वेगवेगळ्या असल्यामुळं ज्या ठिकाणी हरभरा वाढीची अवस्था आहे तिथं इमान १० ग्रॅम + टॉप अप ४० मिली + एलियट ३० ग्रॅम + १९:१९:१९ १०० ग्रॅम असा फवारा आपण वाढीच्या अवस्थेमध्ये देऊ शकतो.
👉ज्या ठिकणी फुल धारणा आहे तिथं सिंजो ७ मिली + झेप १५ मिली + १२:६१:० १०० ग्रॅम आणि मर असल्यास एलियट ३० ग्रॅम किंवा प्रोपीको २० मिली हा फवारा देऊ शकतो.
👉भरपूर फुल असतांनी आपण तिथं व्हिटारा प्लस ४० मिली हे अळीनाशक या सोबत ०:५२:३४ १०० ग्रॅम + भरारी ७ मिली आणि विसल्फ ४० ग्रॅम किंवा मर असल्यास एलियट असा फवारा देऊ शकतो.
👉घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये सुद्धा अळीनाशकमध्ये रावडी १५ मिली किंवा व्हिटारा प्लस ४० मिली आणि या सोबत पाण्याचा ताण पडला असल्यास १३:०:४५ १०० ग्रॅम किंवा सिंचन सुविधा असल्यास बिग बी १०० ग्रॅम + भरारी ७ मिली आणि गरजेनुसार बुरशीनाशक वापरू शकतो.
👉हरभऱ्याला भर फुलात सिंचन केल्यास फुलगळ होऊ शकते त्यामुळं फुलाच्या सुरुवातीला किंवा फुलाच्या शेवटी घाटे भरतांना सिंचन करावे.
👉आंतरमशागत हरभऱ्यामध्ये केल्यास मर रोगाला प्रादुर्भाव कमी होऊ शकतो त्यामुळं फुल लागे पर्यंत आंतरमशागत करायला हरकत नाही.
👉हरभऱ्याची २५ ते ३५ दिवसा दरम्यान पेरणीपासून खुडणी केल्यास फांद्यांची संख्या वाढून उत्पादन वाढण्यासमदत होते.
👉हरभरायच्या घाटेअळीचे नियंत्रण करण्यासाठी शेतामध्ये काड्या लावून त्याला आडवी काडी लावून पक्षी थांबे केल्यास त्याचा सुद्धा त्यात फायदा होऊ शकतो.


🌱इतर पिकाबद्दल माहिती🌱
👉 इतर पिकांमध्ये उन्हाळी पिकांमध्ये भुईमुग ज्वारी बाजरी तीळ आणि मूग हे प्रामुख्याने उन्हाळी पीक घेतली जातात या मध्ये भुईमुगाचा पेरणीचा कालावधी २५ डिसेंबर पासून ते १५ जानेवारी पर्यंत हा योग्य कालावधी आहे याच्या पेरणीला उशीर न केलेला बरा या कालावधीत पेरणी केलेल्या उत्पादन चांगलं येते.
भुईमुगामध्ये वाणाची निवड आपण पाहिल्यास टिएजी २४ हे प्रचलित वाण असून टीजी ३७ टीजी ५१ आणि काही खाजगी कंपन्यांचं जसे वेस्टर्न वगैरे या कंपन्यांचे सुद्धा काही वाण प्रचलित आहे. भुईमुगाचे एकरी बियाणे आपण बियाणाच्या आकारानुसार जाड किंवा मोठ्या वाणांचे असल्यास ५० किलो पर्यंत आणि बारीक वाण असल्यास ४० किलो पर्यंत एकरी बियाणं वापरावं.
भुईमुगाला बीजप्रक्रिया करतांना प्रतिकिलो ३ ते ५ मिली रिहांश आणि ३ ते ५ मिली जोरमेट किंवा ३ ग्रॅम पिक्सल याची बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. भुईमूग हे खादाड पीक असल्यामुळं त्याला पेरणीसोबत एकरी ४ बॅग सुपर फॉस्फेट एक बॅग डीएपी आणि एक बॅग पोटॅश आणि सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये सुद्धा सर्व अन्नद्रव्य देणे गरजेचं आहे.

👉 ज्वारी आणि बाजरीचा पेरणीचा कालावधी साधारणतः १५ जानेवारी पासून ते ३० जानेवारी पर्यंत असून या मध्ये आपल्याला ज्वारीमध्ये विठ्ठल हायटेक अशा विविध खाजगी कंपन्यांचे वाण आहे.
बाजरी मध्ये उन्हाळी बाजरीमध्ये बूस्टर पंढरी मिळाल्यास अवश्य पेरा नसता निर्मल किंवा इतर वाण बाजारामध्ये उपलब्ध आहे एकरी बियाणे ज्वारीचे ३ किलो आणि बाजारीच एकरी १.५ किलो बियाणं पेरणीसाठी वापरावं दोन्ही ज्वारी आणि बाजरीला बीजप्रक्रिया मध्ये ५ मिली रिहांश आणि ३ मिली जोरमेट किंवा पिक्सल याची आपण बीजप्रक्रिया करावी ज्वारी आणि बाजरीला पेरणी सोबत खताच्या मात्रेमध्ये १०:२६:२६ हे द्यावं एकरी एक बॅग आणि २० आणि ४० दिवसाला युरिया अर्धी अर्धी बॅग द्यावी.
🔴व्हाईट गोल्ड ट्रस्ट छ. संभाजीनगर🔴
दिनांक : ६ जानेवारी २०२५

☀️हवामान अंदाज☀️
👉 या आठवड्यात सगळीकडं कोरड हवामान राहण्याचा अंदाज असून कुठेही पावसाची शक्यता नाही थंडी हि मागच्या आठवड्यासारखी राहण्याचा अंदाज आहे.
👉 उन्हाळी पिकांच्या माहितीसाठी व्हाईट गोल्ड ट्रस्टचे युट्युब चॅनेल पहा ज्या मध्ये संपूर्ण पीक व्यवस्थापनाची तांत्रिक माहिती उपलब्ध आहे.

👉 धुवारीमुळं हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात फुल गळ झाली असल्यास नवीन फुल धारणेसाठी झेप २० मिली व १२:६१:० १५० ग्रॅम असा फवारा आपण देऊन हरभऱ्याला नवीन फुल काढणं शक्य होईल.

🟢आजच्या लाईव्ह कार्यक्रमाची लिंक🟢

https://youtu.be/iloPOEdGRXQ?si=aoDHPKeTdRPnOMTY
Photo from GAJANAN JADHAO
सगळ्या शेतकऱ्यांना पाठवा, सरकार पर्यंत पोहचले पाहिजे
*झी 24 तास नि दाखवला सरकारला आरसा.सर्व शेतकऱ्यांकडून मानाचा जय महाराष्ट्र आम्हा शेतकऱ्यांची व्यथा विधानसभेत मांडायला कोणीही तयार नाही फक्त विधानसभेचे दिवस घालण्यासाठी आणि सरकारच्या पैशावर मोज करण्यासाठी ही आमदार लोक त्या विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये जातात परंतु तुम्ही शेतकऱ्यांच्या व्यथा संपूर्ण महाराष्ट्राला दाखवला त्याबद्दल खरोखर शेतकऱ्याच्या वतीने तुमचे मनःपूर्वक आभार*
🌱तुरी बद्दल माहिती🌱
👉 ज्या शेतकऱ्यांना तुरीचा खोडवा घ्यायचा आहे अशा शेतकऱ्यांनी तूर कापण्यापूर्वी इथ्रेल १५ मिली प्रति पंप हा फवारा द्यावा त्यानंतर तूर कापणी करतानी तुरीचे फक्त शेंगा असलेले शेंडे शेंडे कापून घ्यावे. त्याला १०:२६:२६ किंवा डीएपी + पोटॅश हे खत देऊन नंतर पाणी द्यावं आणि नंतर फुले लागल्यानंतर पुढील तीन फवारे फुले लागल्यानंतर भरपूर फुले असतानी आणि दाणे भरतानी असे तीन किंवा गरज पडल्यास मुकण अडकण टाळण्यासाठी चार फवारे द्यावे अशा पद्धतीने तुरीचा खोडवा आपण घेऊ शकतो.
👉 बहुतांश ठिकाणी तूर मॅच्युअर झाली पूर्ण परिपक्व झाली आहे पण काही ठिकाणी अजूनही विदर्भामध्ये तुरीचा तिसरा फवारा किंवा शेवटचा फवारा चालू आहे शेवटच्या फवारणी मध्ये अडकन मुकण होऊ नये व अळी पूर्ण कंट्रोल व्हावी यासाठी रावडी किंवा झेनॉप १५ मिली प्रति पंप बुरशीनाशकामधे विसल्फ ४० ग्रॅम किंवा सुखई ३० मिली आणि दाण्याचा आकार वाढण्यासाठी भरारी ७ मिली विद्राव्य खतामध्ये संचित तूर असेल तर बिग बी किंवा कोरडवाहू तुरीला १३:०:४५ असा फवारा देऊ शकता.
👉 नवीन पांढरी तूर बूस्टर गोदावरी व लाल तुर बूस्टर ७१६ आपल्या भागामध्ये असल्यास अवश्य पहा उत्पादन क्षमता व सर्व वैशिष्ट्ये पाहून पुढच्या वर्षी साठी हे वाण आपण निवडून ठेवू शकता.

🌱इतर पिकाबद्दल माहिती🌱
👉 उन्हाळी पिकांमध्ये भुईमुगाची पेरणी ही २५ डिसेंबर पासून १५ जानेवारी पर्यंत, उन्हाळी ज्वारीची पेरणी हि १५ जानेवारी ते ३० जानेवारी दरम्यान, उन्हाळी तिळाची पेरणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी पर्यंत आणि व उन्हाळी मुगाची पेरणी १५ फेब्रुवारी पासून ते १५ मार्च या दरम्यान आपण पेरणी करू शकतो. ज्यांच्याकडे सिंचनाची जशी व्यवस्था आहे त्या पद्धतीने त्यांनी पिकांची निवड करावी.

👉 कापसाचे फरदड शक्यतो घेऊ नये आणि घ्यायची असेल तर बोंडअळीच्या नियंत्रणासाठी तीन-चार फवारणी करण्याची तयारी असेल तरच त्याचा विचार करू शकता. फरदड घेण्यापूर्वी कापसाला चांगला ताण द्यावा पानझड होऊ द्यावी शेतात मशागत करून शेत स्वच्छ करून नंतर १०:२६:२६ हे खत देऊन पाणी द्यावं आणि पहिलं पाणी दिल्यानंतर साधारणतः २५ - ३० दिवसाला अर्धी बॅग द्यावी. चांगले बुडापासून पाने लागल्यानंतर पानांचा आकार वाढण्यासाठी १०० लिटर पाण्यात दोन ग्रॅम जिब्रालिक ऍसिड व सोबत सरेंडर ३०० मिली + रिहांश २०० मिली + टॉप अप ४०० मिली १०० लीटर पाण्यासाठी हे प्रमणात घेऊन बोंडाचा आकार वाढण्यासाठी सुद्धा याच पद्धतीने फवारणी व अळीचे नियंत्रण सुद्धा या पद्धतीन होऊ शकतो. सध्या हिरवा कापूस असेल तर त्या ठिकाणी इमान १० ग्रॅम + रिहांश २० + रिफ्रेश ४० मिली असा फवारा आपण देऊ शकतो. फरदड कापसाला जास्त पाणी देऊ नये गरजेनुसारच पाणी द्यावे जास्त पाणी दिल्यामुळे लवकर बोंडात रूपांतर होत.
कापूस काढून दुसरे पीक घ्यायचा असेल आणि लवकर कापूस खाली करायचा असेल तर त्यावर ओंडो किंवा ग्रामोक्झोन हे तणनाशक वापरल्यास ४८ तासात कापसाची पाने पाते बोंड सगळं गळून जाऊन बोंड फुटतात आणि पान जळतात.

👉 मका, बाजरी, ज्वारी या पिकावर फॉलआर्मी वर्म म्हणजे लष्करी अळी चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो या साठी इमान १० ग्रॅम + पांडासुपर ३० मिली एकत्र किंवा विटारा प्लस एकट ४० मिली याचा आलटून पालटून फवारा द्यावा हे अळीनाशक अत्यंत प्रभावी आहे. वाढीच्या अवस्थेमध्ये या पिकांना या अळीनाशका सोबत टॉप अप ४० मिली प्रती पंप वापरू शकतो आणि पानांचा चोपडेपणा व त्यात औषध पानावर चिटकून राहावं त्यासाठी बेस्टिकर ५ मिली वापराव.

👉 कांदा या पिकाला खतासोबत रायझर जी देणे हे अत्यंत फायदेशीर ठरतं एकरी ५ ते १० किलो रायझर जी आपल्या बजेट नुसार द्यावं. कांद्यामध्ये थ्रिप्स या किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने असतो त्याच्या नियंत्रणासाठी रेज हे कीटकनाशक वापरावे या सोबतच रिफ्रेश बेस्टिकर वापरू शकतो. त्यानंतर कांद्यातील फुलकिडीचे नियंत्रणासाठी स्वस्त आणि मस्त पांडासुपर, कराटे, सरेंडर, रोगर, इमान, इथिओन हे कीटकनाशके अलटून पालटून फवारावे.
बिजोउत्पादनाच्या कांद्याला अतिरिक्त पाणी दिल्यास सड वाढते त्यामुळं त्याला मोजकेच पाणी द्यावे व बिजोउत्पादनाच्या कांद्याला ट्रायकोबूस्ट डीएक्स अर्धा किलो + सुडोबूस्ट डीएक्स अर्धा किलो दोन वेळेस सोडाव.

👉 उसाचे पाचट न जाळता त्याला बारीक करून जमिनीत गाडावे किंवा तसेच राहू द्यावे नवीन उस लागवडीचे अंतर हे योगी ठेवावे.
🟢श्री गजानन जाधव साहेबांचा कृषी सल्ला🟢

🌱हरभरा बद्दल माहिती🌱
👉 काही ठिकाणी मागच्या आठवड्यात पाऊस पडला आणि दाट धुकं सुद्धा होतं जास्त धुक्यामुळे काही ठिकाणी हरभऱ्याची फुलगळ झाली असेल मोठ्या प्रमाणात फुले गळाली असतील तर नवीन फुलं येण्यासाठी झेप २० मिली व १२:६१:० १५० ग्रॅम याचा फवारा आपण तिथे देऊ शकतो.
👉 काही ठिकाणी हरभऱ्याचे वेगवेगळे लक्षणे दिसतात ते मर रोगाचे आहेत एक एक झाड वाळतय झाड खालून वळताहेत किंवा वरतून वळताहेत झाडे पिवळे पडले पान पिवळे पडलेत हे सगळे मर रोगाचे लक्षणे आहेत.
👉 मर रोग वाढत असल्यास तिथे एलियटचा फवारा ३० ग्रॅम प्रति पंप दिला पाहिजे बऱ्याच ठिकाणी उशिरा पेरलेले हरभरे हे वाढीच्या अवस्थेमध्ये आहे फवारणी मध्ये तिथे आळीसाठी इमान १० ग्रॅम फुटवे काढण्यासाठी टॉप-अप ४० मिली १९:१९:१९ १०० ग्रॅम आणि सोबत बुरशीनाशक मर रोग जास्त असल्यास एलियट ३० ग्रॅम असा फवारा द्यावा मात्र बऱ्याच ठिकाणी आधी पेरलेल्या हरभरे फुलांमध्ये आहे फुलोरा अवस्थेमध्ये आपल्याला अळीनाशकामध्ये सिंजो ७ मिली सोबत नवीन फुल भरपूर काढावं व फुल टिकून राहावं यासाठी झेप १५ मिली १२:६१:० १०० ग्रॅम आणि मर जास्त असल्यास एलियट ३० ग्रॅम किंवा मर नसेल धुवारीपासून वाचण्यासाठी प्रोपीको २० मिली असा फवारा घेऊ शकतो.
👉 हरभऱ्याला भर फुलात शक्यतो सिंचन न केलेलं बरं फुलाच्या सुरुवातीला आणि फुल संपल्यानंतर घाटे लागतांनी सिंचन केल्यास फायदा होतो.
👉 शक्यतो अंतर्मशागत ही फुले लागे पर्यंत हरभऱ्यामध्ये केल्यास फायदा होतो मर रोगाला सुद्धा तिथे नियंत्रण बऱ्यापैकी बसते.
👉 हरभऱ्याला उगवल्यानंतर कुठलेही तन नाशक नाही कुठल्याही तणनाशकाची शिफारस नाही त्यामुळे चुकीचे तणनाशक वापरू नये.
👉 हरभरा हा २५ ते ३५ दिवसाच्या दरम्यान शेंडे खुडणी केली तर मोठे प्रमाणात त्याला फांद्या येतात आणि फांदीची संख्या फुटव्यांची संख्या वाढल्यामुळे उत्पादन वाढतं.
👉 घाटे आळ्याचे नियंत्रणासाठी हरभऱ्यामध्ये काड्या लावून त्याच्यावर अँटीने तयार केल्यास पक्षी बसायला थांबे तयार केल्यास त्याचा फायदा होतो.


🌱गव्हा बद्दल माहिती🌱
👉 गहू पेरणीला आता तास उशीर झाला आहे त्यामुळं गहू पेरणी ऐवजी इतर पर्यायी पीक जस उन्हाळी ज्वारी उन्हाळी तीळ उन्हाळी भुईमूग उन्हाळी मूग या पिकांचा पर्याय आपण निवडू शकतो.
👉 गव्हाला युरिया एकदाच न देता दोन भागात विभागून दिला म्हणजे पेरणी नंतर साधारण २० - २५ दिवसाच्या दरम्यानी आणि ४० - ४५ दिवसाच्या दरम्यानी तर उत्पादनामध्ये किमान २० टक्क्या पर्यंत वाढ होते त्यामुळं युरिया एकदाच न देता ते तेवढाच युरिया मात्र दोन भागात विभागून द्यावा.
👉 गव्हामध्ये रुंद पानांच्या तणांच्या नियंत्रणासाठी अलग्रीप नावाचे तणनाशक योग्य आहे साधारणतः पेरणी झाल्या नंतर २० ते ३० दिवसा पर्यंत जमिनीत ओलावा असतानी अलग्रीप रुंद पानांचे नियंत्रण योग्य पद्धतीनं होऊ शकत या अलग्रीप सोबत फुटव्यांसाठी आपण टॉप अप सुद्धा टाकू शकता व खोडकिडा किंवा पोंगे मर जर असेल तर अलग्रीप या तणनाशकासोबत रेज १५ मिली सुद्धा आपण वापरू शकता. तस तणनाशक फवारायच नसेल मोठ्या प्रमाणात पोंगेमर असेल तर अशा वेळेस आपण रेज १५ मिली फवारून पोंगे मरला नियंत्रण मिळवू शकतो.
👉 जास्त पाणी दिल्यास गव्हा मध्ये पिवळेपण येतो त्यामुळं नियंत्रित पाणी देणे गरजेचे आहे गव्हाला फुटवे कमी असल्यास टॉप अप एक पंपाला ४० ते ५० मिली याचा फवारा आपण देऊ शकतो.
👉 काही ठिकणी गव्हाला लवकर ओंब्या लागल्याहेत आणि गहू निसवला आहे त्याच कारण पेरणीमध्ये घाई करून थंडी पडण्यापूर्वी पेरणी केलेल्या ठिकाणी या पद्धतीनं गहू लवकर निसवला आहे त्याला कुठलाही उपाय नाही.
👉 काही शेतकऱ्यांना गव्हाची उंची वाढण्याची अडचणी होतात त्यासाठी आपणच बियाण्यालाच बीज प्रक्रिया लिहोसीनची करायला सांगितली होती मात्र ती केली नसेल आणि उंची नियंत्रित ठेवायची असेल तर गव्हामध्ये फुल लागण्यापूर्वी ३०० मिली लिहोसीन ५ ते १० किलो रेतीमध्ये मिसळून एका एकरमध्ये आपण पाणी देण्या पूर्वी तिथं फेकू शकतो.
👉 गव्हाला ओंब्यात दाना भरण्याची अवस्था व त्या नंतर फुलोरा अवस्था या नाजूक अवस्था असतात अशा अवस्थांमध्ये सिंचन व्यवस्थित करावे पाण्याचा ताण पडू देऊ नये.
👉 गव्हाला दाणा भरतांनी जर १०० लिटर पाण्याला भरारी ५० मिली जिब्रेलिक ऍसिड २ ग्रॅम आणि बिग बी हे विद्राव्य खत १ किलो असा जर फवारा दिला तर उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते.
🔴व्हाईट गोल्ड ट्रस्ट छ. संभाजीनगर🔴
दिनांक: ३० डिसेंबर २०२४
☀️हवामान अंदाज☀️
⁕ या आठवड्यात सगळीकडे कोरड हवामान अपेक्षित आहे आणि गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात थंडीत ही वाढ होणार आहे. राज्याच्या इतर भागा पेक्षा पूर्व विदर्भात थंडीचा जोर जास्त राहील साधारणतः पूर्व विदर्भात किमान तापमान हे १० ते १२ अंश पश्चिम विदर्भ मराठवाडा आणि खानदेशामध्ये किमान तापमान १२ ते १५ अंश व राज्यातील दक्षिण भागामध्ये किमान तापमान १५ ते १८ अंश राहील असा अंदाज आहे.

⁕ मागच्या आठवड्यात ज्या भागात पाऊस पडला व धूवारी आली तिथे फुलोरात असलेल्या हरभऱ्याची फुलगळ होऊ शकते. फुलगळ झाल्यास झेप २० मिली व १२:६१:० १५० ग्रॅम चा चणावर फवारा घ्यावा.

⁕ आम्ही शिफारत करत असलेल्या औषधाचे प्रमाण हे १५ लिटरचा साधा किंवा १० लिटरच्या पेट्रोल पंपाची आहे पंप बदलल्यास त्यानुसार औषधाचे प्रमाण बदलावे.


👉 आजच्या लाईव्ह कार्यक्रमाची लिंक
https://www.youtube.com/live/qPPdAQpGx8Q?si=FvNOzhpMCaHZi_xm
भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏
बहुजनांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहचविणारे डॉ भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏💐🌹
आजच्या लाईव्ह कार्यक्रमाची लिंक इच्छुकांनी लाईव्ह अवश्य पहा.

https://youtu.be/qtYqunsot0Y?si=c7CBmPNhC7dqRn7Q
हवामान अंदाज
दिनांक २५ डिसेंबर २०२४

👉🏻 राज्यात २७-२८ डिसेंबर दरम्यान गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज खान्देश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजाची दखल घेऊन शेतीचे नियोजन करावे २७ - २८ डिसेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

👉🏻 २७ डिसेंबरला दुपारपासून मेघगर्जनेसह पावसाची सुरुवात सर्वात प्रथम नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यांसह, दक्षिण मराठवाडा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांतील पूर्व भागांमध्ये होईल. शुक्रवार रात्रीपर्यंत वादळी पाऊस पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यात हजेरी लावेल, ज्यात बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांमध्ये काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उर्वरित जिल्ह्यांतील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता देखील आहे.

👉🏻 २८ डिसेंबरच्या पहाटेपर्यंत वादळी पाऊस पूर्वेकडे सरकेल आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांत हजेरी लावेल. यात यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, आणि चंद्रपूर जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांमध्ये काही प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता आहे. पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाची स्थिती या दिवशी देखील कायम राहण्याची शक्यता आहे. या दिवशी एकंदरीत विदर्भात आणि मराठवाड्यात आभाळी हवामान अपेक्षित असल्यामुळे कमाल तापमानात थोडी घट होईल. मात्र खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईल.

👉🏻 २९ डिसेंबरला विदर्भ आणि मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाण वगळता राज्यातील बहुतांश भागांत स्थिर हवामान पाहिला मिळेल.

👉🏻 ३० डिसेंबर पासून थंडीत वाढ होईल.
👉 शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार नियोजन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. प्राण्यांना आणि काढणी केलेल्या पिकांना पाऊस, गारपीट आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे. वादळ आल्यास झाडांखाली, मोकळ्या जागेत, टिनाच्या शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आसरा घेऊ नये.

https://youtu.be/YtVKJL6IOEo
See more posts

View in Telegram