YCMOU Scholarship

This is official Telegram Channel of YCMOU. to Share information of Admission & Scholarship Related Information

View in Telegram

Recent Posts

ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला शिष्यवृत्ती पर्याय स्वीकारून अल्प शुल्क जमा केले होते, अशा विद्यार्थ्यांना नोंदणी कक्षाला [email protected] या मेलवर विनंती अर्ज पाठवून संपूर्ण शुल्क जमा करण्याबाबत लिंक पाठविण्याची विनंती करावी. लिंक प्राप्त झाल्यानंतर संपूर्ण शुल्क जमा करावे आणि त्यानंतर त्या शुल्काची पावती व उपरोक्त प्रपत्र नाशिक मुख्यालयात टपालाद्वारे व मेलद्वारे पाठवावेत. 👆
शैक्षणिक सत्र 2018-19 ते 2023-24 मध्ये शिष्यवृत्ती अर्ज सादर केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ज्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रक्कम शासनाकडून मंजूर करण्यात आली असून, विद्यापीठ खात्यावर वर्ग करण्यात आली आहे, अशा विद्यार्थ्यांची यादी, सूचनापत्रक व टपालाने आणि मेलद्वारे पाठवावयचे प्रपत्र. विद्यार्थ्यांनी यादीत आपले नाव असल्याची खात्री करून सूचनापत्रक काळजीपूर्वक वाचावे. सोबतच्या सहपत्रांमधील सर्व माहिती योग्य नमूद करावी, सहपत्र व शुल्क जमा केल्याची अभ्यासकेंद्राच्या पावतीची मूळ प्रत, शुल्काची माहिती नमूद असलेला प्रवेश अर्ज, बँक पासबुकचे बँक खात्याची माहिती असलेले स्पष्ट पृष्ठ इ. Documents सह ही माहिती टपालाने व मेलद्वारे त्वरित पाठवावी.
2018-19 मध्ये आपल्या विद्यापीठात प्रवेशित व महाडिबीटी संकेतस्थळावरून ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्ज सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे काही तांत्रिक कारणामुळे अर्ज System Rejected दाखविण्यात आले होते. शासनाच्या नविन आदेशानुसार अशा विद्यार्थ्याना ऑफलाईन शिष्यवृत्ती अर्ज सादर करून करण्याची परवानगी देण्यात आली असून, त्यासंदर्भातील शिष्यवृत्ती कक्षाचे सूचनापत्र व विद्यार्थ्यांची यादी इथे प्रसिद्ध करीत आहे, . आपल्या संपर्कात शैक्षणिक सत्र 2018-19 मध्ये शिष्यवृत्ती अर्ज सादर केलेले विद्यार्थी असल्यास, कृपया सदर सूचना त्यांचेपर्यंत पोहोचवावी, ही विनंती.
शिष्यवृत्ती अर्ज सादर केलेल्या विद्यार्थ्यांसाठी मेल करावयाच्या प्रपत्रांच्या नमुना प्रती व सूचना
सुप्रिय विद्यार्थी मित्रांनो, महाडिबीटी संकेतस्थळावरील शेवटच्या सूचनेनुसार दि. 15 जुलै 2024 पर्यंत ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत होती. काही विद्यार्थ्यांनी दि. 19 जुलै 2024 रोजी Re-Apply करता येत नसल्याचे दूरध्वनीद्वारे कळविले होते. मात्र विद्यापीठ लॉगीनच्या सर्वच अर्जांवर कार्यवाही केल्यानंतरही काही विद्यार्थ्यांचे अर्ज विद्यापीठ लॉगीनला आलेले दिसत आहेत. म्हणजेच विद्यार्थ्यांना अजूनही Re-Apply करता येतेय. त्यामुळे या सूचनेद्वारे सर्वच विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटींमुळे त्यांच्या लॉगीनला परत पाठविण्यात आले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी तातडीने त्रुटींची पूर्तता करून महाडिबीटी संकेतस्थळावरून आपला शिष्यवृत्ती अर्ज Re-Apply करायचा आहे. सर्व विद्यार्थ्यांना अतिशय कळकळीने कळविण्यात येते की, शैक्षणिक सत्र 2023-24 साठी कदाचित ही शेवटची संधी असू शकेल. (शैक्षणिक सत्र 2023-24 साठी महाडिबीटी संकेतस्थळ कधीही बंद करण्यात येऊ शकते) त्यामुळे आर्थिक व शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ज्या विद्यार्थ्यांना महाडिबीटी संकेतस्थळाद्वारे किंवा मेलद्वारे त्रुटी कळविण्यात आल्या आहेत, त्यांनी त्या त्रुटी समजून घेऊन, अजिबात वेळ वाया न घालवता तातडीने त्रुटींची पूर्तता करून Re-Apply करावे. 🙏🙏🙏🙏🙏
सुप्रिय विद्यार्थी मित्रांनो, निकाल बघण्यासाठी https://ycmou.digitaluniversity.ac/Content.aspx?ID=1442 या लिंक वर click करा
सुप्रिय विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक सत्र 2023-24 मध्ये शिष्यवृत्ती पर्यायाने प्रवेश घेतलेल्या व मे 2024 मध्ये परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना, विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जात नमूद केलेल्या मेलवर त्यांचा निकाल परीक्षा विभागाकडून पाठविण्यात येत आहे, याची…
ज्या विद्यार्थ्यांनी कुठल्याही शैक्षणिक सत्रात पूर्ण शुल्क जमा करून प्रवेश घेतला होता व शासनाकडून त्यांची शिष्यवृत्ती मंजूर होऊन विद्यापीठाला पाठविली आहे, अशा विद्यार्थ्यांच्या प्राप्त शिष्यवृत्ती रकमेची बँकेकडून पडताळणी सुरू असून, पडताळणी झाल्यानंतर यापूर्वीच कळविण्यात आलेल्या Documents ची टपालाद्वारे ज्या विद्यार्थ्यांनी पूर्तता केली आहे, अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या आधार लिंक बँक खात्यावर ही रक्कम विद्यापीठाकडून वर्ग करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांची नावे यापूर्वीच्या यादीत नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्रपणे सूचना व विद्यार्थ्यांची यादी लवकरच कळविण्यात येईल.
सुप्रिय विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक सत्र 2023-24 मध्ये शिष्यवृत्ती पर्यायाने प्रवेश घेतलेल्या व मे 2024 मध्ये परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना, विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जात नमूद केलेल्या मेलवर त्यांचा निकाल परीक्षा विभागाकडून पाठविण्यात येत आहे, याची कृपया विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. तसेच विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती पर्याय स्वीकारूनही शिष्यवृत्ती अर्ज सादर केला नसल्यास / त्यांची शिष्यवृत्ती शासनाकडून मंजूर झाली नसल्यास किंवा शासनाकडून विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्ती रक्कम प्राप्त झाली असल्यास विद्यार्थ्यांनी नोंदणी कक्षाशी [email protected] या मेलवर संपर्क साधून शुल्क जमा करण्याबाबत कार्यवाही करावी.
शिष्यवृत्ती पर्याय स्वीकारलेल्या ज्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रक्कम शासनाकडून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. अशा विद्यार्थ्यांनी शासनाच्या निर्देशाप्रमाणे विद्यार्थ्यांच्या अर्जात नमूद असलेल्या निर्वाह भत्याची रक्कम वगळता उर्वरित रक्कम विद्यापीठात जमा करणे आवश्यक आहे. शुल्क जमा करण्यासंदर्भातील माहितीसाठी [email protected] या मेलवर व (0253) 2230580/2231715 या क्रमांकावर विद्यार्थ्यांनाी नोंदणी कक्षासोबत संपर्क साधावा.
See more posts

View in Telegram